पुणे

Maharashtra Prison Department : महाराष्ट्र कारागृह विभाग, कॉफी टेबल बुक अनावरण 2024

Maharashtra Prison Department News : पुणे, महाराष्ट्र कारागृह विभागाने तयार केलेल्या परिवर्तन कॉफी टेबल Parivartan Café Table बुकचे अनावरण आज दि १६ रोजी अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा.डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह), मुख्यालय, पुणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. बंदीवानांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. त्याअनुषंगाने कारागृहांतर्गत विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन त्यांना न्याय देण्यासाठी कारागृह प्रशासनाने प्राधान्य दिले. विशेषतः बंदीवानांच्या भौतिक गरजा पुर्ण करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केलेले आहे. Maharashtra Prison Department Latest News

मा. श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी १८ जुलै २०२२ रोजी कारागृह विभागाचा पदभार स्वीकारला होता. तेव्हापासून १५ जुलै २०२४ कालावधीत विविध कारागृहांचे रुपडे पलटण्यात आले. बंद्यांच्या सुख-सोयीसाठी नाविन्यपुर्ण योजना राबविण्यात आल्या. त्यामध्ये नन्हे कदम, गळाभेट, दुरध्वनी योजना, वॉशिंग मशिन, स्वच्छ पाण्यासाठी वॉटर प्युरीफाइड्, कौटुंबिक भेटीसाठी ज्यादा वेळ, सीसीटीव्ही यंत्रणा, भजन स्पर्धा, शेती उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यासोबत नाविन्यपुर्ण योजनामुळे बंदीवानांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. Maharashtra Prison Department Latest News

कारागृहांतर्गत बदल, बंदीवानांसाठी राबविण्यात आलेल्या योजना, उपक्रमांची माहिती, महाराष्ट्र कारागृह विभागाने तयार केलेल्या परिवर्तन कॉफी टेबल बुकद्वारे मांडण्यात आली आहे. कॉफी टेबल बुकचे अनावरण मा. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक श्री. अमिताभ गुप्ता यांनी केले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मा. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक श्री. अमिताभ गुप्ता म्हणाले, कारागृहातील बंद्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी प्रयत्न केले आहे. विशेषतः कारागृहातंर्गत स्वच्छता, बंद्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्यामुळे बंदीवानांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होवून आजारपणाचे प्रमाण घटण्यास मदत झाली. प्रामुख्याने, या विभागात काम करताना नाविण्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात केल्याचा आनंद आहे. त्यासोबतच प्रशासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी तितक्याच तत्परतेने सर्व उपक्रमांची अंमलबजावणी वेळेत केली त्याचा फायदा कारागृह विभागाला इ गाला आहे. आगामी काळातही बंद्यांना बहुतांश योजना उपक्रमांचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. Maharashtra Prison Department Latest News

मा. विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह), मुख्यालय, पुणे डॉ. जालिंदर सुपेकर म्हणाले, राज्यभरातील बहुतांश कारागृहातंर्गत सुरु केलेल्या विविध उपक्रमाद्वारे बंद्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. त्याचे संपूर्ण श्रेय मा. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक श्री. अमिताभ गुप्ता यांना आहे, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांचा पाठपुरावा योग्य वेळेत करण्यात आला. त्यामुळेच कारागृहातंर्गत बंदीवानांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवरील योजनांची अंमलबजावणीही तितक्याच तत्परतेने संबंधित अधिकाऱ्यांनी पार पाडल्याचे सांगितले. दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन मा.विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी केले. Maharashtra Prison Department Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0