•पक्ष फुटी नंतर विदर्भात पक्ष बांधणी करिता मोठे काम, महाविकास आघाडी कडून जुन्नर विधानसभेवर शिवसेनेचा दावा? राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांना विलास वाव्हळ यांचे आव्हान?
मुंबई :- राज्यात विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यभरात पक्ष बांधणी करिता आणि योग्य उमेदवारांची चाचपणी सर्व पक्षांकडून चालू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील पहिले दोन उमेदवार जाहीर केले आहे. तर, 8 ऑगस्ट पासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संकल्पना यात्रा चालू होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष बांधणी चालू केली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडूनही भगवा सप्ताह, कार्यक्रम चालू करण्यात आला असून त्या माध्यमातून मतदार आणि योग्य उमेदवार यांची चाचणी चालू आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवसाकरिता दिल्ली दौऱ्यावर असून इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार आहे. महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या यशानंतर विधानसभेवरही महाविकास आघाडी आपला झेंडा रोहणार असल्याचे बोलले जात असताना आता शिवसेना ठाकरे गटाकडून जुन्नर मतदार संघावर विलास वाव्हळ आळेकर यांनी दावा केला आहे. पक्ष फुटी नंतर विलास वाव्हळ पक्ष बांधणी करिता अहोरात्र मेहनत घेतल्याचे बोलले जाते. तसेच महाराष्ट्रातील तेली समाजाचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून विलास वाव्हळ यांना पाहिले जाते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली. तसेच जुन्नरकरांच्या प्रश्न बाबत सदैव अग्रस्थानी असतात, बहुतांश जुन्नरकरांचे तसेच तेली समाजाची विलास वाव्हळ यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून आणि महाविकास आघाडी कडून संधी मिळावी अशी मनोभावना असल्याचे म्हटले जात आहे.
महाराष्ट्रातील तेली समाजाचा महत्त्वाचा चेहरा
विलास वाव्हळ आळेकर मागील 35 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात सक्रिय असून त्यांनी आत्तापर्यंत अनेक महत्त्वाची पदाची जबाबदारी शिवसेना ठाकरे गटाकडून पार पाडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष संघटक आणि पक्ष कार्यकारी सदस्य, बृहन महाराष्ट्र तेली समाज, संताजी तेली क्रांती मोर्चा चे संस्थापक अशा पदांवर ते गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्य करत आहे. शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख ,पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख या पदावर असताना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भरीव कामगिरी करत महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेऊन विजय प्राप्त करून दिला आहे. तसेच महाराष्ट्र सह गुजरात राज्यातही त्यांचे तेली समाजावर प्राबल्य मोठ्या प्रमाणावर आहे. विदर्भात 28 विधानसभा मतदारसंघ असून सर्व मतदारसंघांमध्ये तेली समाजाचे मोठे वर्चस्व असून जर का विलास वाव्हळ यांना उमेदवारी दिली तर निश्चितच जुन्नर सह विदर्भातही तेली समाजाकडून उद्धव ठाकरे यांना चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विलास वाव्हळ हे संजय राऊत यांचे निकटवर्ती असून काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी तयारीला लागा असे सांगितले होते. त्यामुळे विलास वाव्हळ यांना महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाकडून संधी मिळाली तर अजित पवार गटाचे स्थानिक आमदार अतुल बेनके यांच्यासमोर एक मोठे आव्हान असणार आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…