मुंबई

Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आठ आमदारांचा राजीनामा वाचून दाखविला

•विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आठ आमदारांचे राजीनामे मंजूर, विधिमंडळात वाचून दाखविला

मुंबई :- राज्याचे पावसाळी अधिवेशन आज सकाळी 11:00 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यात एकूण 11 आमदारांनी राजीनामे दिले होते त्यापैकी आठ आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचून दाखवले आहे. राजू पारवे वगळता जामदारांनी राजीनामे दिले आहे ते सर्व आमदार लोकसभेवर निवडून गेले आहे. त्यामुळे त्यांना विधानसभा सदस्यात्वाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मध्ये काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड, निलेश लंके, प्रणिती शिंदे यांच्यासह आठ आमदारांनी राजीनामे दिले आहे. तर राजू पारवे यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने आपल्या पदाचा राजीनामा देऊन रामटेक मतदार संघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली परंतु त्यांचा काँग्रेसच्या श्याम कुमार बर्वे यांनी पराभव केला आहे.

राजीनामा दिलेल्या सदस्यांची माहिती
राजू पारवे – उमरेड विधानसभा (राजीनामा – 24 मार्च)
निलेश लंके – पारनेर विधानसभा (राजीनामा – 10 एप्रिल)
प्रणिती शिंदे – सोलापूर शहर मध्य विधानसभा
बळवंत वानखेडे – दर्यापूर विधानसभा
प्रतिभा धानोरकर – वरोरा विधानसभा (13 जून)
संदीपान भुमरे – पैठण विधानसभा (14 जून)
रविंद्र वायकर – जोगेश्वरी पूर्व विधानसभा
वर्षा गायकवाड – धारावी विधानसभा

शिंदे सरकारचे हे अंतिम अधिवेशन असून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात शेतकरी, कार अपघात, मराठा ओबीसी आरक्षण, नीट परीक्षा अशा विविध विषयावर हे अधिवेशन अतिशय आक्रमक ठरणार आहे.अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होत आहे. तर 28 जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0