Vasant More : वसंत मोरे यांच्या हाती शिवबंधन, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश
Vasant More Joined Thackeray Group : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्याचे मनसेचे आणि त्यानंतर वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते वसंत मोरे यांनी आपल्या पदाधिकारी आणि 23 नेत्यांसोबत शिवसेनेत प्रवेश
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करत लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केले आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. पुण्यातील तब्बल 23 मनसेच्या नेत्यांनी वसंत मोरे यांच्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. वसंत मोरे यांनी पक्षप्रवेशानंतर माझ्या पक्ष प्रवेश नसून मी स्वगृही परतलो आहे अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिले आहे.
वसंत मोरे म्हणाले, “1993 यामध्ये पहिल्यांदा शाखाप्रमुख झालो. बारावी पास झाल्यानंतर मी शाखाप्रमुख होतो. 16 व्या वर्षी मी शिवसैनिक झालो होतो. माझा हा प्रवेश नाही मी परत एकदा शिवसेनेत आलो आहे. आम्ही सर्व मिळून पुण्यात एक ताकद उभी करू असे मी आश्वासन देतो. माझ्यासह अनेक पुण्यातील नेते स्वगृही परतले आहेत”, असे वसंत मोरे म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, “मी वसंत तात्यांचे स्वागत करतो. खूप दिवसांनी पाऊस झाला आणि वसंत फुलला आहे. खूप दिवसांपासून वसंत मोरे काय करणार अशा चर्चा सुरू होत्या. अखेर ते मातोश्रीच्या मंदिरात दाखल झाले आहेत. ते आधी शिवसैनिक होते. त्यांच्या येण्याने नक्कीच पुण्यात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. सर्वांनी मिळून आता पुण्यातील शिवसेना आपल्याला पुढे घेऊन जायची आहे”, अशा भावना राऊतांनी व्यक्त केल्या आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले, “वसंतराव काय करणार हे आम्ही पाहात होतो. ते पहिले शिवसैनिक होतात. शिवसेनेतून बाहेर गेल्यावर सन्मान मिळतो का हा अनुभव घेऊन तुम्ही स्वगृही परतले आहात. त्यामुळे तुमच्यावर आता मोठी जबाबदारी आहे. आता त्यांची शिक्षा हीच की त्यांनी पुण्यात शिवसेनेची ताकद वाढवली पाहिजे. लोकसभा निवडणुकीत जनतेने दिशा दाखवली. ती निवडणूक लोकशाहीसाठी होती. आता विधानसभेची लढाई ही राज्याच्या अस्मितेची असणार आहे. त्यात पुणे तर विद्येचे माहेरघर आहे. त्यामुळे पुणे सत्ताबदलाचे केंद्र झाले पाहिजे. मी अनेक दिवसांपासून पुण्यात आलो नाही. मात्र आता पुण्यातील शिवसैनिकांसाठी मी येणार आहे. पुणे आपल्याला भगवामय करायचे आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आज जवळपास मनसेचे 17 शाखाअध्यक्ष, 5 उपविभाग अध्यक्ष, 1 शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकारी बऱ्यापैकी पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी वसंत मोरे यांच्यासोबत शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला आहे.