मुंबई
Trending

Aaditya Thackeray : शाळेत जाऊनच शिका!” — आदित्य ठाकरेंचा शिक्षण मंत्र्यांवर जोरदार हल्ला

Aaditya Thackeray On Maharashtra Sarkar : हे सरकार चालवताय की कॉमेडी शो? आदित्य ठाकरे यांचा ट्विट करत सरकारला सवाल

मुंबई | राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेचे मौखिक शिक्षण सक्तीचे करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीकेची झोड उठवली असून, विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“शाळेत जाऊन आधी तुम्हीच धडे घ्या, मग इतरांना शिकवा!” अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं, “पहिलीतील मुलांवर आधीच तीन भाषांची सक्ती आहे. त्यात आता मौखिक हिंदी शिकवा म्हणताय, पण पुस्तकच नाही! हे सरकार चालवताय की कॉमेडी शो?”

गुरुवारी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंत हिंदीचे ‘मौखिक शिक्षण’ दिले जाईल आणि ही बाब अभ्यासक्रमात नाही, तर भाषेची ओळख म्हणून शिकवली जाईल. मात्र, या स्पष्टीकरणानंतरही वाद थांबलेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0