मुंबई

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेकडून धक्का ! माजी आमदार, जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

शिवसेना शिंदे गटात वाशिम जिल्ह्यातील 53 सरपंच, 23 उपसरपंच आणि 63 ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश, ठाकरे गटाला शिंदेंचा दे धक्का

मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाला शिंदे गटाकडून पुन्हा एकदा दे धक्का करण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार उत्तमराव खंदारे आणि रविकांत पाटील तसेच माजी जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून हाती धनुष्यबाण घेतले आहे. तर दुसरीकडे, वाशिम जिल्ह्यातील तब्बल 53 सरपंच 23 उपसरपंच आणि 63 ग्रामपंचायत सदस्य यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

“गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक” या तत्त्वावर राज्यभरात शिंदे सेनेकडून ऑपरेशन टायगर चालू आहे. शिवसेना ठाकरे गटाला शिंदे गडाकडून दिवसेंदिवस सुरुंग लावल जाते आहे.वाशिम जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल गिरकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप ठाकूर व माजी पोलीस उपअधीक्षक रायते यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

त्यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीराम महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग, श्रीराम महासंघाचे अध्यक्ष आकाश बेग, उबाठा गटाचे नेवासा नगरपंचायतीतील माजी नगरसेवक सचिन वडागळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हा सरचिटणीस मनोज भिसे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरसेवक, पदाधिकारी आणि युवा पदाधिकाऱ्यांनीह सुद्धा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

एकनाथ शिंदे म्हणाले की,गेली अडीच वर्षे महायुती सरकारने केलेल्या कामांच्या बळावर आणि लोककल्याणकारी योजनांमुळे विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने आपल्याला भरभरून मतदान केले. त्यामुळेच आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे आता आपली जबाबदारी अजून वाढली असून ‘गाव तिथे शिवसेना’ आणि ‘घर तिथे शिवसैनिक’ निर्माण करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन याप्रसंगी सर्वांना केले. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही यासमयी बोलताना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0