मुंबई
Trending

Mumbai COVID Cases : महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा शिरकाव!

 Mumbai Corona Cases in last 24 Hours : मुंबईत सर्वाधिक रुग्ण; राज्यभरात 89 नव्या रुग्णांची नोंद

मुंबई | महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे सावट गडद होत असल्याचे संकेत मिळत आहेत. Mumbai COVID Cases मंगळवारी (10 जून) राज्यात एकूण 89 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, यामुळे एकूण बाधितांची संख्या 1,596 वर पोहोचली आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे 719 रुग्ण आढळले आहेत.

या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत राज्यभरात 18,103 चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 1596 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या राज्यात 615 रुग्ण सक्रिय असून त्यापैकी बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरीच उपचार घेत आहेत. आतापर्यंत 959 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.  Mumbai Corona Cases in last 24 Hours

सहव्याधींमुळे मृत्यूची संख्या 17 वर; बहुतांश रुग्ण घरगुती उपचारावर

मुंबई महापालिकेच्या हद्दीत 32 नवीन रुग्ण तर पुण्यात 23, पिंपरी-चिंचवड 9, कल्याण 4, छत्रपती संभाजीनगर 4, ठाणे व नागपूर प्रत्येकी 3, सातारा 3 आणि चंद्रपूरमध्ये 2 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय नवी मुंबई, मीरा-भायंदर, रायगड, पुणे ग्रामीण, सांगली व गोंदिया या प्रत्येक जिल्ह्यात एक रुग्ण आढळला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सहव्याधींनी ग्रस्त रुग्णांचा मोठा वाटा आहे. एका मृत व्यक्तीस COPD, ब्राँकायटिस व हृदयाशी संबंधित अतालता होती.

राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्ह्यांना चाचणी क्षमतेत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. सुदैवाने, तिसऱ्या लाटेसारखीच परिस्थिती निर्माण न होता, बहुतेक रुग्ण सौम्य लक्षणांसह घरगुती उपचार घेत असल्याने रुग्णालयातील भार सध्या कमीच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0