मुंबईठाणे
Trending

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का, ठाकरेंच्या निष्ठावंताचा शिंदे सेनेत प्रवेश!

Maharashtra Latest Political News : ठाकरे गटाला मागील काही महिन्यांपासून गळती लागली असताना अमरावतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे.

मुंबई :- ठाकरे गटाला मागील काही महिन्यांपासून गळती लागली असताना ठाण्यात रविवारी पुन्हा एकदा शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणारे अमरावतीचे माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती संजय बंड यांनी शिवसेनेत असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला होता. शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उपस्थित राहून मोठ्या संख्येने शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर धनंजय बंड, तालुकाप्रमुख सुनील डिके, गोपाळ लांजुरकर, सतीश काळे, अमोल पहिले, सागर बहुतकर, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिंदे गटात प्रवेश केला.

अमरावतीनंतर मुंबई महानगरपालिकेच्या ठाकरे गटाचे माजी विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर आणि त्यांच्या पत्नी दीक्षा कारकर यांनी असंख्य शिवसैनिकांसोबत शिंदे गटात सामील झाले आहे. मागील काही दिवसांपासून शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणावर धक्का दिल्या जात आहे. काही दिवसातच महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होईल तत्पूर्वी पक्षांतरांच्या घटना वाढताना पाहायला मिळत आहे.

महानगर निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटांनी पुन्हा एकदा न्यायालयात चिन्ह आणि पक्षाचे नावाबाबत याचिका दाखल केली आहे. शिवसेना फुटी नंतर शिवसेना चिन्ह आणि नाव हे शिंदे गटाला देण्यात आले आहे. तर उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव देऊन मशाल असे चिन्ह देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0