• मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट; राज ठाकरेंचा मविआ नेत्यांसोबत सहभाग ; संजय राऊतांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही बैठकीत येण्याचे निमंत्रण
मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवणारा संकेत देत, निवडणूक प्रक्रियेतील शंकांवर चर्चा करण्यासाठी आज, मंगळवारी (14 ऑक्टोबर) राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे महाविकास आघाडीच्या (मविआ) नेत्यांसोबत सहभागी होणार आहेत.
शिष्टमंडळात ‘पवार-ठाकरे-राज’ एकत्र
सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवर काही शंका असल्याने त्या दूर करून लोकशाही अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा समावेश असेल.
मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण
या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसून, निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपातीपणे व पारदर्शक व्हावी हाच मुख्य उद्देश असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच, लोकशाहीची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी होण्याचे निमंत्रण पत्राद्वारे दिले आहे.
काँग्रेसमध्ये मतभेद; पवारांची मंत्रालयात हजेरी
राज ठाकरे हे शिष्टमंडळात सहभागी होणार असल्याने काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. पक्षाच्या काही नेत्यांनी मनसेसोबत पक्षाच्या नेत्यांनी जाऊ नये, अशी भूमिका मांडली आहे.दरम्यान, शरद पवार हे अनेक वर्षांनंतर मंत्रालयात येणार असल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतरच त्यांनी यापूर्वी मंत्रालयात भेट दिली होती.
मतदार यादी हरकतींना मुदतवाढ
राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांसाठी 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आता अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…