Maharashtra Politics : राजकीय चर्चांना उधाण ; उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकच लिफ्टमध्ये..
Maharashtra Politics : चंद्रकांत दादा पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांना चॉकलेट दिले, अनिल परब यांना चंद्रकांत दादांनी पेढा भरविला
मुंबई :- राज्यात शिंदे सरकारचे पावसाळी शेवटचे अधिवेशन आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होईल. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधान भवन परिसरातून लिफ्टने प्रवास करताना अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली. या दोघांनी एकमेकांना नमस्कार केला बातचीत केली त्यानंतर दोघे एकाच लिफ्ट मध्ये शिरून प्रवास केला त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या जवळचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर याही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये कोणताही राजकीय संवाद झाला का असे विचारले असता त्याबाबत कोणीही भाष्य केले नाही. परंतु उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडवणीस एकत्र लिफ्ट मधून गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला अंगावर घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून दारुण पराभव केला होता. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय गणित बदलणार का? असा प्रश्न यावेळी निर्माण झाला आहे. Maharashtra Monsoon Session Latest Update
तर दुसरी महत्वाची घटना म्हणजे राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची भेट घेतली आहे. अंबादास दानवे यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांना पेढे भरवण्यात आले तर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे नेते अनिल परब यांना स्वतःच्या हाताने पेढा भरवला आहे. तसेच, उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांना चंद्रकांत दादांनी चॉकलेट दिले आहे. आज झालेल्या दोन राजकीय घटनेमुळे भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळे राजकीय चित्र दिसणार का? प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झालाय. Maharashtra Winter Session Latest Update