मुंबई

Pankaja Munde : पंकजा मुंडे सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक

Pankaja Munde At Siddhi Vinyak Temple : विधान परिषदेच्या भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी दादरच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन विधानभवनाच्या दिशेने

मुंबई :- राजकीय पुनर्वसन भाजपाने मोठा चेहरा म्हणून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभा आणि लोकसभा यात झालेला पराभव नंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचे जागा (Vidhan parishad election) घोषित केल्यानंतर त्यांचे यंदा राजकीय पुनर्वसन होणार असल्याचे राजकीय तज्ञांचे मत व्यक्त केले आहे. आज होणाऱ्या विधान परिषदेच्या मतदानापूर्वी भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले त्यांच्या समोर नतमस्तक होऊन पंकजा मुंडे या विधानसभेच्या दिशेने गेले आहे. Maharashtra Vidhan Parishad Election Update

विधान परिषदेच्या 11 जागा साठी 12 उमेदवार रिंगणात आहे. महायुतीकडून 9 तर महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार रिंगणात उभे आहे. भाजपाने पाच उमेदवार शिवसेना शिंदे गटाने दोन उमेदवार अजित पवार गटाने दोन उमेदवार दिले आहे. तर काँग्रेसने एक शिवसेना ठाकरे घटनाने एक आणि शेकापाचे जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पाठिंबा जाहीर करत हे तीन उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात उतरलेले आहे. क्रॉस वोटिंग ची शक्यता यंदाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत दर्शवलेली आहे. त्याचा फटका जास्त करून अजित पवार गटाच्या उमेदवारांना मिळणार असल्याची राजकीय चर्चा दिसून येत आहे. Maharashtra Vidhan Parishad Election Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0