मुंबई

Maharashtra Politics News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना गती; ऑक्टोबरमध्ये अंतिम प्रभाग रचना निश्चित

महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोग सज्ज

मुंबई | राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर गती मिळताना दिसत आहे. महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आवश्यक असलेली प्रभाग रचना प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, येत्या ऑक्टोबर 2025 मध्ये ती अंतिम होणार आहे. त्यानंतर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आदी निवडणुकांच्या तयारीला औपचारिक सुरुवात होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने यासाठी चार महिन्यांचा स्पष्ट कालावधी निश्चित केला असून, 6 ऑक्टोबरनंतर मुंबई महापालिकेची तर 13 ऑक्टोबरपर्यंत ‘ड’ वर्गातील नाशिक, औरंगाबादसारख्या महापालिकांची प्रभाग रचना अंतिम करण्यात येणार आहे. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुका चार टप्प्यांत पार पडणार आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये कोरोनाची साथ, ओबीसी आरक्षणाचा पेच आणि न्यायालयीन अडथळ्यांमुळे या निवडणुका वारंवार लांबणीवर टाकल्या जात होत्या. मात्र, आता निवडणूक आयोगाने कंबर कसली असून, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच निवडणूक प्रक्रियेची घोडदौड सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रभाग रचनेचा टप्प्यानिहाय कार्यक्रम

17 जून – 31 जुलै : स्थळ पाहणी, जनगणना माहिती, प्रारूप प्रभाग नकाशे तयार करणे

1 ऑगस्ट – 5 ऑगस्ट : प्रस्ताव नगरविकास विभागास सादर

6 ऑगस्ट – 11 ऑगस्ट : प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला

22 ऑगस्ट – 28 ऑगस्ट : प्रारूप रचना प्रसिद्धी व हरकती मागवणे

29 ऑगस्ट – 8 सप्टेंबर : सुनावणी

22 – 26 सप्टेंबर : अंतिम रचना नगरविकास विभागाकडे

3 ऑक्टोबर – 6 ऑक्टोबर : अंतिम अधिसूचना प्रसिद्धी

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago