मुंबई

Maharashtra Politics : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक

•देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते आणि अधिकारी उपस्थित

मुंबई – मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारने आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली.

या बैठकीला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, तसेच मंत्री शिवेंद्रराजे भोसले, राधाकृष्ण विखे पाटील आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांवर आणि आरक्षणासंदर्भात कायदेशीर व प्रशासकीय बाजूंचा विचार करण्यात आल्याची माहिती आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे, ज्यामुळे सरकारवर मोठा दबाव आहे. या बैठकीत आंदोलकांची भूमिका आणि मागण्यांवर विचारविनिमय करण्यात आला. ही बैठक मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.या बैठकीतून कोणता निर्णय समोर येतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago