Maharashtra Politics : मातोश्रीवर माजी आमदारांचा पक्षप्रवेश, रत्नागिरीत पुन्हा एकदा भाजपला धक्का
•अजित पवार गटाच्या नगर जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे यांचा मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश!
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटात इन्कमिंग चे प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात होत आहे. महायुतीतील म्हणजेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश झाला आहे. आज (23 ऑक्टोबर) मातोश्रीवर भाजपच्या दोन माजी आमदारांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला असून तर अजित पवार गटाच्या श्रीगोंदा विधानसभेतील नगर जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
भाजपचे रत्नागिरी विधानसभेचे माजी आमदार बाळा माने यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या स्वागताकरित शिवसेना नेते विनायक राऊत संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक त्यांच्यासह मोठ्या संख्यावर कार्यकर्ते उपस्थित होते.
कोल्हापूर राधानगरी विधानसभेचे माजी आमदार के पी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तसेच खासदार संजय राऊत शिवसेना नेते विनायक राऊत आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
तसेच श्रीगोंदा विधानसभेत अजित पवार गटाला धक्का बसला असून अजित पवार गटाचे नगर जिल्हा अध्यक्ष अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे यांनी आपल्या सहकार्यासह शिवसेना ठाकरे गटात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश केला आहे.
मातोश्रीवर मागील काही दिवसांपासून इतर पक्षातील नेते मंडळांची पक्षप्रवेशासाठी धडपड चालू आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अनेक महत्त्वाचे नेत्यांना डावळल्याने नाराज आणि बंड पुकारलेल्या नेत्यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याचे धाडसत्र सुरूच आहे.