ठाणे

Maharashtra Politics : शिवसेना पक्षचिन्ह वादावरील अंतिम सुनावणी 12 नोव्हेंबरवर ढकलली

Shiv Sena symbol case Supreme Court hearing : आज कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला केली सुरुवात; ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निर्णय घ्यावा’ अशी मागणी 12 आणि 13 नोव्हेंबरला अंतिम युक्तिवाद होण्याची शक्यता; महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात उत्सुकता

ANI :- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह या वादावर आज, 8 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अंतिम सुनावणी पार पडणार होती. मात्र, आजच्या सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करण्यास सुरुवात केल्यानंतर, न्यायालयाने आता ही सुनावणी येत्या 12 आणि 13 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्याचे जाहीर केले आहे. Shiv Sena symbol case Supreme Court hearing

आज सुनावणीला सुरुवात होताच शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. सिब्बल यांनी आपले म्हणणे मांडताना, जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली.

युक्तिवाद सुरू असताना, इतर वकील वारंवार मध्यस्थी करत असल्याने सिब्बल यांनी त्यांना थांबवले आणि “आधीच खूप वेळ गेला आहे, आता सुनावणी घ्या,” अशी मागणी केली.

45 मिनिटांचा वेळ मागितला

कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादासाठी न्यायालयाकडे किमान 45 मिनिटांचा वेळ मागितला. यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी अंतिम युक्तिवाद होईल असे स्पष्ट केले आणि आजची सुनावणी संपल्याचे जाहीर केले.

त्यामुळे, आता 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. यानंतर खरी शिवसेना कोणाची यावर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago