मुंबई
Trending

Maharashtra Politics: सरपंच खून प्रकरणात टार्गेट झालेल्या धनंजय मुंडेंचा पक्षाकडून पाठराखण, अजित पवारांनी त्यांना ही जबाबदारी दिली.

Maharashtra Political Latest Update : महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनेत बदल केले आहेत. त्यांनी एक टीम तयार केली आहे जी निवडणुकीसाठी रणनीती बनवण्याचे काम करेल.

मुंबई :- राष्ट्रवादीने मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांचा नव्याने स्थापन केलेल्या ‘कोअर ग्रुप’मध्ये समावेश केला आहे. बीडच्या सरपंचाच्या हत्येप्रकरणी Beed Sarpanch Murder त्यांचा एक जवळचा सहकारी वाल्मिकी कराड याला अटक झाली.कराड यांच्या अटकेमुळे धनंजय मुंडे यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. पक्षाने धनंजय मुंडे यांना डॅमेज कंट्रोल साठी एवढी मोठी जबाबदारी दिली असावी असे सध्या बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी संघटना मजबूत करण्यासाठी, धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि कल्याणकारी योजना सुरू करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांचा ‘कोअर ग्रुप’ तयार केला आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुतीचा भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी कोअर कमिटी तयार करण्यात आली आहे. या कोर कमिटीमध्ये धनंजय मुंडे यांना स्थान दिले आहे.अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांचाही समावेश आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तटकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पक्षाची पुनर्रचना आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणनीतीवर काम करणे हा या कमिटीचा मुख्य उद्देश असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0