• नाशिकच्या दोन लग्नसोहळ्यांमध्ये राजकीय रंग; ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांची अनपेक्षित हालचाल
नाशिक :- नाशिक शहरात रविवारी आणि सोमवारी दोन मोठे लग्नसोहळे पार पडले, पण या लग्नांपेक्षा चर्चेत राहिली ती राजकीय नेत्यांची उपस्थिती आणि एक अनपेक्षित भेट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे एकाच वेळी नाशिकमध्ये असताना, ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
मुख्यमंत्री फडणवीस हे पुतण्याच्या विवाहासाठी आणि साईबाबा हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी शहरात आले होते. तर, संजय राऊत हे आपल्या पक्षाच्या महानगरप्रमुखाच्या मुलीच्या लग्नासाठी नाशिकमध्ये उपस्थित होते. याचदरम्यान, बडगुजर यांनी फडणवीस यांची भेट घेऊन सिंहस्थ कुंभमेळा संदर्भातील मागण्यांचे निवेदन दिले.
मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याच्या निमित्ताने भेट – बडगुजर यांचे स्पष्टीकरण
संपूर्ण माहिती देताना सुधाकर बडगुजर म्हणाले, “मुख्यमंत्री यांच्याकडे मी कालपासून वेळ मागितली होती. आज सकाळी त्यांनी वेळ दिली आणि मी फक्त निवेदन देण्यासाठी आलो होतो. संजय राऊत यांनाही याची पूर्वकल्पना होती. यात राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही.”
तरीदेखील, बडगुजर यांच्या या अचानक भेटीने चर्चांना नवा विषय दिला आहे. विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्याने थेट सत्ताधाऱ्यांच्या गोटात जाऊन निवेदन दिले, हे काही सामान्य प्रकरण नाही, अशी चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आगामी महापालिका निवडणुका आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट कोणते संकेत देत आहे, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…