महाराष्ट्र
Trending

Maharashtra Politics: भाजपा आमदार सुरेश धस यांनी घेतली मंत्री धनंजय मुंडे यांची भेट !

Dhananjay Munde And Suresh Dhas Meeting : धनंजय मुंडे आणि सुरेश धस साडेचार तास एकत्र, तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय? सुरेश धस

छत्रपती संभाजीनगर :- भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. Dhananjay Munde And Suresh Dhas Meeting धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन सुरेश धस यांनी भेट घेतली या भेटीनंतर राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. मागील काही दिवसांपासून सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातला वाद पूर्ण राज्यांनी पाहिला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेले वाल्मीक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहे. त्या हत्यामध्ये वाल्मीक कराड सहभागी असल्याने याचा संबंध धनंजय मुंडे यांच्याशी असल्याचा गंभीर आरोप दस यांच्याकडून गेल्या कित्येक दिवसांपासून केलं जात आहे. तसेच धनंजय मुंडे यांना मंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी ही धस यांच्याकडून लावून धरली आहे. यामध्येच सुरेश धस धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तब्बल साडेचार तास त्यांच्या घरी असल्याची बातमी बाहेर आली आहे.

सुरेश धस धनंजय मुंडे यांच्या भेटीवर बोलताना म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटलो होतो. यात वेगळी काहीच चर्चा झाली नाही. आमचा लढा सुरूच राहणार आहे. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगळे प्रकार आहेत. आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. या लढ्यात काहीच फरक पडणार नाही. तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय आहे? तसेच या भेटीचा वेगळा अर्थ तुम्ही काढू नका, असा सल्ला देखील सुरेश धस यांनी पत्रकारांना दिला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

दरम्यान, या भेटीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी, धनंजय मुंडे आणि सुरेश धस साडेचार तास एकत्र होतो. धनंजय मुंडे आणि आमचे जुने संबंध आहेत. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची परिवारीक भेट झाली आहे. आम्ही तिघेही परिवारीक भेट म्हणून भेटलो. तसेच पुढे ते म्हणाले कॉम्प्रोमाइज करायला कोणी सांगितले नाही. आमच्यात मतभेद आहेत मनभेद नाहीत, असे बावनकुळे म्हणाले.

माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो, काळ मतभेद दूर करतो. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे मतभेद दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारीक भेट झाली आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो. त्यांच्या मतभेद आहेत, मनभेद नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0