•उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजन मराठे, ज्योती मराठे आणि बाबाजी पाटील यांचा प्रवेश
ठाणे :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) कल्याण-डोंबिवलीमध्ये मोठा धक्का बसला आहे. मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे आणि त्यांच्या पत्नी ज्योती मराठे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
मराठे दाम्पत्यासह मनसेचे उपशहराध्यक्ष किशोर कोशी, मनसे विद्यार्थी सेनेचे सुरज मराठे, रवींद्र बोबडे, संजय तावडे, केतन खानविलकर, सुधीर थोरात यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजन मराठे हे मनसेचे महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांच्या या निर्णयामुळे कल्याण-डोंबिवलीतील मनसेची ताकद कमी होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बळ मिळाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या पक्षप्रवेशाचे परिणाम दिसून येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…