मुंबई

Maharashtra Politics : टिटवाळ्यात भाजपला मोठा धक्का!

•माजी नगरसेवक सुरेश भोईर, प्रदिप भोईर यांचा ‘मातोश्री’वर शिवसेनेत (उबाठा) प्रवेश; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनगटावर शिवबंधन!

मुंबई :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका जशी जशी जवळ येत आहे.तसे,ठाणे जिल्ह्यातील राजकारणात मोठी राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. टिटवाळ्यातील भाजपचे माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि भाजपचे ठाणे जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांनी त्यांच्या अनेक निष्ठावान सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. भाजपसाठी हा टिटवाळ्यातील मोठा धक्का मानला जात आहे.

आज (दिनांक 21 नोव्हेंबर 2025) मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. उद्धवसाहेबांनी स्वतः भोईर बंधूंच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

या प्रवेशामुळे टिटवाळ्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी चिंतेची बाब ठरू शकतो.

यावेळी शिवसेना उपनेते विजय (बंड्या) साळवी, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, जिल्हासंघटक रेखा कंटे आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0