
•शिवसेना ठाकरे गटाचे कोकणातील मोठ्या नेत्यांनी दिला राजीनामा, शिवसेना ठाकरे गटाला धक्का
मुंबई :- छत्रपती संभाजीनगरचे माजी शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच, कोकणातही ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरीचे तालुका प्रमुख यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माजी आमदार राजन साळवे यांनी देखील विनायकराव त्यांच्याबद्दल तक्रारीचा पाढा वाचून ठाकरे गटाला रामराम करण्याची देखील तयारी दाखवल्याचे बोलले जात आहे. मात्र योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांनी आपल्या पदाचा राजीनाप दिला असून लवकरच ते शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे. साळवी यांनी त्यांच्या राजीनामाचा जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे दिला आहे. प्रदीप साळवे यांचा रत्नागिरी ग्रामीण भागात देखील चांगला जनसंपर्क असल्यामुळे ठाकरे गटाला निश्चितच मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेकडे कोकणात माजी खासदार विनायक राऊत माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडेच नेतृत्व आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडे मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, माजी मंत्री रामदास कदम यांसारखे दिग्गज नेते कोकणात तळ ठोकून बसल्याने ठाकरे गटावर वर चढ आहे. मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच 28 जानेवारीपर्यंत ठाकरे गटातील अनेक नेते हे शिंदे गटात येणार असल्याचे बोलले आहे.