Maharashtra Politics: निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारचा मास्टर स्ट्रोक, UPS लागू करणारे पहिले राज्य ठरले
Maharashtra Politics Latest News : निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच एकनाथ शिंदे सरकारने मोठा मास्टर स्ट्रोक केला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर अवघ्या एका दिवसात राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) मंजूर केली आहे.
मुंबई :- केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही राज्य कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीम (यूपीएस) मंजूर केली आहे. रविवारी झालेल्या बैठकीत शिंदे मंत्रिमंडळाने यूपीएसला ग्रीन सिग्नल दिला आहे. राज्याच्या एकनाथ शिंदे CM Eknath Shinde सरकारने या वर्षापासून म्हणजेच मार्च 2024 पासून यूपीएस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यासह महाराष्ट्र सरकार यूपीएस Maharashtra Sarkar UPS लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत यूपीएसबाबत 19 मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी 7,15 कोटी रुपयांची मंजुरी, शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंड वीज योजना, सहकारी साखर कारखान्यांना सरकारी हमी अंतर्गत कर्जाची परतफेड आदींचाही समावेश आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. राज्यातील सुमारे 50 लाख ज्येष्ठ नागरिकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
युनिफाइड पेन्शन योजना म्हणजे काय?
शनिवारी मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन प्रणाली, यूपीएसला मंजुरी दिली होती. किमान 25 वर्षे काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 50 टक्के पेन्शन देण्यात येईल, असे केंद्र सरकारने जाहीर केले. याशिवाय 10 वर्षांपेक्षा कमी काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा 10,000 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. यासोबतच एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरीवर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना पेन्शन देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.