मुंबई

Maharashtra Politics : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 14 अर्ज

•उमेदवारांनी एकूण 24 अर्ज भरले आहे, भाजपा 05, शिवसेना शिंदे गट 02, अजित पवार गट 02, काँग्रेस 01, शिवसेना उद्धव ठाकरे 01, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचा शेकापाच्या जयंत पाटील यांना पाठिंबा, आणि दोन अपक्ष असे एकूण 14 अर्ज

मुंबई :- विधान परिषदेच्या चार जागेच्या निवडणुकीनंतर आता 11 जागेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. मंगळवारी (02, जुलै) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता या दिवशी 11 जागां करिता एकूण 14 अर्ज आले आहे त्यामुळे विधान परिषदेत कोणते 11 आमदार बाजी मारणार हे पाहणे उत्सुकताचे ठरणार आहे.

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचे अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवसापर्यंत 11 जागांसाठी 14 उमेदवारांनी एकूण 24 अर्ज भरले आहेत. भाजपाच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांनी आज अर्ज भरले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनी अर्ज भरला. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांनीही अर्ज भरला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

याशिवाय अजयसिंग सेनगर आणि अरुण जगताप या अपक्ष उमेदवारांनीही अर्ज भरले आहेत. या अर्जांची छाननी उद्या होणार असून 5 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 12 जुलै रोजी मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे.

vivek

Recent Posts