मुंबई
Trending

Maharashtra Political Update : “चड्डी बनियन गँग” विरोधात विधानभवनात घोषणाबाजी; संजय गायकवाड प्रकरणावरून महाविकास आघाडीचा एल्गार

Mahavikas Aghadi Latest News : विधानसभेच्या पायऱ्यांवर आक्रमक घोषणाबाजी; सरकारविरोधात संतापाचा स्फोट,गायकवाड यांचा ‘बॉक्सिंग’ अवतार बॅनरवर झळकला; गुंडाराजविरोधात विरोधक एकवटले

मुंबई :- शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड Sanjay Gaikwad यांनी आमदार निवासात कर्मचाऱ्याला चड्डी-बनियनवर मारहाण केल्याप्रकरणी राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या धक्कादायक प्रकाराचा निषेध करत महाविकास आघाडीच्या Mahavikas Aghadi नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज (16 जुलै) तीव्र आंदोलन केले.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, शिवसेना (ठाकरे गट) चे अंबादास दानवे, काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यासह अनेक विरोधी आमदार सहभागी झाले होते. घोषणांचा जलप्रलय करत त्यांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला.

“चड्डी बनियन गँग हाय हाय”, “या गुंडाराज सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय!” अशा आक्रमक घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात वापरण्यात आलेले बॅनर विशेष लक्षवेधी ठरले. एका बॅनरवर “महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियनचा धिक्कार असो” असा उल्लेख करत, गायकवाड यांचा बॉक्सिंग अवतार छायाचित्रासह दाखवण्यात आला होता.

दरम्यान, गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतरही, सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अधिवेशनाच्या उर्वरित तीन दिवसांत विरोधक या मुद्द्यावरून पुन्हा आक्रमक होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0