Vasai BVA Member Joined BJP : 3 दशकांचे वर्चस्व संकटात; बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
वसई – विरार :- आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वसई-विरारच्या राजकारणात तीन दशकांहून अधिक काळ आपले वर्चस्व टिकवून ठेवणाऱ्या बहुजन विकास आघाडी (बविआ) समोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे. बविआला आता ‘फुटीचे ग्रहण’ लागले असून, एकापाठोपाठ एक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करत असल्याने बविआसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. Maharashtra Latest Political Update
भाजपची सक्रियता वाढली
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजप वसई-विरारमध्ये चांगलीच सक्रिय झाली आहे. आगामी पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विरोधी पक्ष असलेल्या बविआचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
माजी नगरसेवकासह कार्यकर्त्यांचा प्रवेश:
वसई पश्चिम नुकताच वसई पश्चिमेतील विशालनगर येथील बविआचे माजी नगरसेवक प्रदीप पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार स्नेहा दुबे पंडित यांची उपस्थिती होती.
नालासोपारा (सोपारा गाव). यापाठोपाठ नालासोपारा येथील सोपारा गावातील बविआचे प्रमुख कार्यकर्ते मोहक पाटील, सचिन देसाई, नितीन देसाई, निवास रहाटे, हितेश पाटील, हितेश निर्मल, जितेंद्र मेहता अशा 40 हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, मनोज पाटील आणि मनोज बारोट उपस्थित होते.
निवडणुकीच्या तोंडावर बविआचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपमध्ये सामील होत असल्याने, स्थानिक राजकारणावर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता असून, बविआच्या स्थानिक वर्चस्वाला भाजप आव्हान देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…