Maharashtra Political News : “मंगळसूत्र चोराचा” घोषणेनंतर दोन्ही गटात तणाव; राजकारणाची नवी ‘खंडोबा’
मुंबई : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन भरात असतानाच, राजकीय टीका-टिप्पणीतून आता थेट शिवीगाळीच्या वळणावर पोहोचल्याचं चित्र समोर आलं आहे. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात उघडपणे शाब्दिक झटापट झाल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच गाजतो आहे.
काही दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी “मंगळसूत्र चोराचा…” अशा घोषणा देत नाव न घेता गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केलं होतं. या घोषणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद चिघळला होता. त्याचे पडसाद आज विधानभवनाच्या गेटवर प्रत्यक्ष पाहायला मिळाले. पडळकर कारमधून उतरताना दरवाजा जोरात ढकलल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. त्यानंतर दोघांमध्ये जाहीर वादावादी झाली आणि सभागृहाबाहेरही वातावरण चांगलेच तापले.
भाजप आमदार पडळकर हे वारंवार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जातीय आणि व्यक्तिगत पातळीवरील टीका करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून होतो आहे. त्याला प्रत्युत्तर देताना आव्हाडांनीही “मंगळसूत्र चोर” असे उल्लेख करत टोले लगावले. या पार्श्वभूमीवर झालेली आजची वादावादी, म्हणजेच राजकारणाचा ‘अधिवेशन स्पेशल’ तमाशा म्हणावा लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोप करण्यात आला की, “गोपीचंद पडळकर हे विरोधकांवर अपमानास्पद भाषा वापरत असून त्यांच्यासारख्या स्थानिक निवडणुकीत अपयशी ठरलेल्या लोकांना भाजप मोठी पदं देतं. त्यामुळेच हे लोक अशा पद्धतीची विधाने करतात.”
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…