Maharashtra Police Transfer Latest News: मुंबई उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्याकडे राज्य राखीव पोलीस बलाचे उप महानिरीक्षक पदाची जबाबदारी
मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या Maharashtra Vidhan Sabha Election तोंडावर पुन्हा एकदा राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहे. Maharashtra IPS Officers Transfer निवडणुका लागण्यापूर्वी अनेक महत्त्वाच्या पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्या बदल्यांचे सत्र कायम चालू आहे. कोणत्याही क्षणी राज्यात आचारसंहिता लागू होऊ शकते तसेच विधानसभेच्या निवडणुका या साधारणतः नोव्हेंबरच्या शेवटला होण्याची शक्यता दिसत असताना राज्यात आता आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहे. Maharashtra Police Latest News
राज्य पोलीस दलातील आयपीएस आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश सोमवारी गृह विभागाकडून काढण्यात आले आहे. तसेच मुंबईच्या उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्याकडे राज्य राखीव पोलीस बलाचे उप महानिरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच उत्तर प्रादेशिक विभागावर अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून सशस्त्र पोलीस दलाचे अभिषेक त्रिमुखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Maharashtra Police Latest News
कोणत्या अधिकाऱ्यांच्या कुठे बदल्या?
1.पोलीस उपायुक्त संजय लाटकर-बंदर परिमंडळ-सायबर महाराष्ट्र विभागात पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती.
2.पोलीस उपायुक्त प्रशांत कदम-परिमंडळ 4-अनुसूचित जाती व जमाती आयोग नियुक्ती.
3.पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत-परिमंडळ 6- महाराष्ट्र सायबर विभाग नियुक्त
4.पोलीस उपायुक्त शिवराज पाटील-एसीबी ठाणे
5.वाशिमचे अप्पर पोलीस अधीक्षक भरत तांगडे-ठाणे जिल्ह्यात नियुक्ती
6.राज्य गुप्तवार्ता विभागाचे (नागपूर) उप आयुक्त संदीप भाजीभाकरे- पुणे पोलीस आयुक्तालय येथे नियुक्ती