Maharashtra Police Latest News : समन्वय समितीमध्ये पोलीस बॉईज संघटनेचे, अध्यक्ष राहुल दुबाले यांची सदस्य म्हणून नियुक्ती
मुंबई :- पोलिसांच्या Maharashtra Police समस्यांवर वाचा फोडण्यासाठी गेल्या अनेक वर्ष अनेक संघटना सातत्याने काम करत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता तसेच आपले कर्तव्य निष्ठेने पूर्ण करणाऱ्या पोलिसांना त्यांच्या कुटुंबाला योग्य तो वेळ आणि योग्य तो न्याय देण्यासाठी वेळ नव्हता. कुटुंबीयांच्या समस्या, त्यांचे राहणीमान, मुलांचे शिक्षण, विविध समस्यासाठी पोलिसांना सातत्याने नोकरीच्या काळात ताण सहन करावा लागतो. पोलिसांच्या कुटुंबाच्या, वसाहती, कामाचे वेळा, वेतन, पेन्शन यांसारख्या विविध मागणी आणि अनेक समस्या पासून पोलीस वर्ग वंचित होता. परंतु राज्य सरकारने पोलीस कुटुंबाच्या कल्याण आणि त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत एक समिती गठीत केली आहे. 12 सदस्य असलेल्या समितीमध्ये महाराष्ट्र बॉईज पोलीस संघटनेचे अध्यक्ष असलेले राहुल दुबाळे यांनाही सदस्यत्व देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्ष पोलीस कुटुंबीयांसाठी सातत्याने लढा देण्यासाठी या संघटनेतून अग्रेसर आहे. Maharashtra Police Latest News
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली असून, मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, राम कदम, सिद्धार्थ शिरोळे, विधान परिषदेचे आमदार परिणय फुके, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, उपाध्यक्ष-नि-व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले या 12 सदस्यांची कमिटी तयार करण्यात आली आहे. Maharashtra Police Latest News
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…