Maharashtra Police Bharti: पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा..

Maharashtra Police Bharti: राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात 17,471 पदासाठी पोलीस भरती, मैदानी चाचण्या पुढे ढकलण्याचे…
मुंबई :- राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी पोलीस भरतीच्या Maharashtra Police Bharti मैदानी चाचणी संदर्भात मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात एकूण 17,471 पदासाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. परंतु राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. ज्या ठिकाणी पाऊस चालू आहे त्या ठिकाणाच्या मैदानावरील चाचण्या पुढे ढकलण्यात आल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. राज्यात यापुढे पावसाचे दिवस असून त्यानंतर आचारसंहिता सुरू होईल असेच देवेंद्र फडणवीस म्हणाले अशा वेळी पोलीस भरती मैदानी चाचणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न आहे कारण उमेदवारांसाठी शेवटची संधी असते त्यांना ती संधी मिळाली पाऊस असलेल्या ठिकाणी मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. Devendra Fadnavis On Police Bharti

फडणवीस म्हणाले की, राज्यातील काही ठिकाणी पोलिस भरती प्रक्रिया रद्द झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठे भाष्य केले आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे. तिथे चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. पाऊस पुढे वाढणार आहे, त्यानंतर आचारसंहिता लागेल. त्यामुळे चाचणी पुढे गेली आहे. मुलांचे वय निघून जाईल. त्यानंतर त्यांना दुसरी संधीही मिळत नाही. त्यात मुले घरी चालले आहेत. त्यांच्यासाठी फारशा व्यवस्था नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी मंगल कार्यालय व्यवस्था करायला सांगितले आहे’, असे त्यांनी जूनमध्ये पोलीस भरती घेण्यावर भाष्य केलं. Devendra Fadnavis On Police Bharti
फडणवीस म्हणाले की, आपण सर्वात आधुनिक सायबर केंद्र तयार केले आहे. लवकरच ते कार्यान्वित होईल. त्यामुळे देशात सर्वात सशक्त पोलिस दल आपले असेल. प्रकल्पामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारीची माहिती काढणे, सीसीटीव्ही तपासणी, नंबर प्लेट ओळखणारा कॅमेरा नसला तरी याच्या माध्यमातून शोधून काढू शकतो. काही महिने लागतात, ते काही मिनिटात शोधता येईल. वाहतूक नियोजनात फायदा होईल. या प्रकारचे मॉड्युल तयार करून सर्व युनिट्स इंटिग्रेड करणे सोपे होईल. Devendra Fadnavis On Police Bharti