Maharashtra Oath Ceremony: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, 1000 लाडकी बहिण…, देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यातील पाहुण्यांची यादी जाहीर
Maharashtra Oath Ceremony: देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
मुंबई :- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना नवीन सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. आज गुरुवारी (5 डिसेंबर) राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. Maharashtra Oath Ceremony मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे.
शपथविधी सोहळ्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. कडक सुरक्षा व्यवस्था आहे. त्याचबरोबर पाहुण्यांची यादीही तयार करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींशिवाय ‘लाडकी बहिण’ योजनेच्या 1,000 लाभार्थ्यांनाही त्यांच्या शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
भाजप नेते प्रसाद लाड यांनी सांगितले की, शपथविधी सोहळ्याला सुमारे 42,000 लोक उपस्थित राहणार आहेत. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी, नऊ ते दहा केंद्रीय मंत्री आणि 19 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.ते म्हणाले, 40,000 भाजप समर्थकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे आणि विविध धर्माच्या नेत्यांसह 2,000 व्हीआयपींसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हे पाहुणे समारंभास उपस्थित राहणार आहेत
-पंतप्रधान नरेंद्र मोदी
-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
-भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा
-एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री
-केंद्रीय मंत्री
-ऋषी आणि संत
-‘लाडकी बहिण” योजनेच्या 1,000 लाभार्थी महिला
-उद्योग, मनोरंजन, शिक्षण आणि साहित्यविश्वातील नामवंत व्यक्ती
-महायुतीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते – भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी.
पोलिसांचा फौजफाटा तैनात
एका अधिकाऱ्याने सांगितले की, शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी 4,000 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षा व्यवस्थेसाठी किमान 3,500 पोलीस आणि 520 अधिकारी तैनात करण्यात आले आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.