Maharashtra News : शरद पवार,सुप्रिया सुळे, अजित पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर
Baramati News : बारामती मध्ये नमो रोजगार मेळावा, सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याशी बोलणे टाळले
पुणे :- बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह शरद पवार यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती पाहायला मिळत आहे. Maharashtra News
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुका जसजसा जवळ येत आहेत, तसतसे पवार कुटुंबात काही तरी घडत असल्याचे दिसत आहे. पवार कुटुंबातील नाराजी आता प्रकर्षाने समोर येत असून जाहीर कार्यक्रमातूनही ती दिसताना पाहत आहे. बारामतीत सुरू असलेल्या राज्य सरकारच्या नमो रोजगार मेळाव्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर होते. एकमेकांच्या बाजूलाच उभे होते. पण दोघांनीही एकमेकांकडे पाहणे आणि भेटणे टाळलं. सुप्रिया सुळे सर्वांना भेटल्या. विचारपूस केली. पण दादांची विचारपूस केली नाही. यापूर्वी पवार कुटुंबात असे कधीच घडले नव्हते. बारामतीकरांनी मात्र हे चित्र पहिल्यांदाच पाहिले. त्यावेळी अनेकांना आश्चर्यही वाटले. Maharashtra News
नमो रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले आहेत. साधारण पावणे अकरा वाजता मुख्यमंत्री बारामतीत येणे अपेक्षित होते. मात्र नियोजित कार्यक्रमामुळे त्यांना बारामतीत यायला उशीर झाला आहे. अजित पवारांकडून त्यांचे बारामतीतील विमानतळावर स्वागत करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून नमो रोजगार मेळाव्याची राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली. शरद पवारांचे नाव पत्रिकेतून वगळण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता शरद पवार नमो रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी पोहचले आहेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडत आहे.
पवारांकडे भोजनास जाणार नाहीत देवेंद्र फडणवीस
बारामती येथे नमो रोजगार मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे यांच्यासह फडणवीस आणि अजित पवार यांनाही स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले होते. मात्र, फडणवीस यांनी शुक्रवारी पवारांना पत्र पाठवून आपले निमंत्रण मिळाले, त्यासाठी आभारी आहे. मात्र, नियोजित कार्यक्रम असल्यामुळे भोजनास येऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.