मुंबईठाणे

Maharashtra News : राज्यात राजकीय धुसफूस: ड वर्ग महापालिकांवर IAS नियुक्तीवरून शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद

Maharashtra Political Update : नगर विकास विभागात फडणवीसांचा हस्तक्षेप; शिंदे नाराज असल्याची माहिती

मुंबई :- राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘ड’ वर्गाच्या महानगरपालिकांवर सनदी (IAS) अधिकारी नेमण्यावरून त्यांच्यात मतभेद झाल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत या महापालिकांवर बिगर सनदी अधिकारी नियुक्त केले जात होते, मात्र आता फडणवीस यांनी आयएएस अधिकारी नेमण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

शिंदे यांची नाराजी का?

सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या काही अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाल्यामुळे ते आधीच नाराज आहेत. त्यातच, नगर विकास विभाग (जो एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे) यामध्ये फडणवीस यांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे शिंदे यांची नाराजी अधिक वाढली आहे. ‘ड’ वर्गाच्या 19 महानगरपालिकांवर आयएएस अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत, ज्यामुळे शिंदे समर्थक अधिकाऱ्यांना डावलले जाण्याची शक्यता आहे.

शिंदे गटातही नाराजी नाट्य सुरू; मुंबईतील अनेक पदाधिकारी नियुक्तीवरून राजीनामा देण्याच्या तयारीत

एकनाथ शिंदे एका बाजूला फडणवीसांवर नाराज असताना, दुसरीकडे त्यांच्या स्वतःच्या पक्षातही नाराजी नाट्य सुरू आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने विभागप्रमुखांच्या केलेल्या नियुक्त्यांवरून अनेक इच्छुकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघात माजी नगरसेवक नाना अंबोले यांच्या विभागप्रमुखपदी नियुक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या मतदारसंघातील 5 पैकी 4 शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकारी या नियुक्तीला विरोध करत आहेत. त्यांनी राजीनामा देण्याची तयारीही केली आहे. पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याचा आरोपही काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

या नाराजीमुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. पदाधिकाऱ्यांनी या नियुक्तीविरोधात सह्यांची मोहीम सुरू केली असून, लवकरच याबाबतचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0