मुंबई

Maharashtra News: संरक्षण उत्पादन कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द! सैन्यासाठी दारूगोळा बनवणाऱ्या कंपनी एमआयएलकडून सूचना

Maharashtra News: राष्ट्रीय सुरक्षा आणि कामकाजाची निकड लक्षात घेता, एमआयएलने सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या आहेत. चांदा ऑर्डनन्स प्लांटसह सर्व युनिट्सना कर्तव्यावर पूर्ण उपस्थिती सुनिश्चित करण्याच्या सूचना.

मुंबई :- भारतीय सैन्यासाठी दारूगोळा बनवणारी संरक्षण मंत्रालयाची मुख्य कंपनी, म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) ने त्यांच्या सर्व युनिट्समधील कर्मचाऱ्यांच्या रजा तात्काळ रद्द केल्या आहेत.राष्ट्रीय सुरक्षा आणि ऑपरेशनल निकड लक्षात घेऊन 2 मे रोजी हा निर्णय घेण्यात आला. Maharashtra News

संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा ऑर्डनन्स प्लांटने शुक्रवारी (2 मे) त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याचे परिपत्रक जारी केले.

प्लांटच्या डेप्युटी जनरल मॅनेजरने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (एमआयएल) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या निर्देशानुसार, “सर्व प्रकारच्या रजा” तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत.या परिपत्रकात म्हटले आहे की सर्व कर्मचाऱ्यांनी न चुकता कर्तव्यावर हजर राहावे आणि “या महत्त्वाच्या काळात” राष्ट्रीय आवश्यकतांनुसार अखंड उपस्थिती आणि योगदान सुनिश्चित करावे.

परिपत्रकात असेही स्पष्ट केले आहे की, प्लांटची कार्यक्षमता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी “राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी आणि ऑपरेशनल निकडीच्या दृष्टीने” हा आदेश जारी करण्यात आला आहे.यासोबतच, कोणत्याही कर्मचाऱ्याला फक्त आपत्कालीन परिस्थितीतच रजा दिली जाईल, असेही सांगण्यात आले.या पावलाद्वारे, ऑर्डनन्स प्लांटने हे सुनिश्चित केले आहे की कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणामुळे किंवा विलंबामुळे देशाच्या सुरक्षेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. या आदेशामुळे कारखान्यातील कामगार आव्हानात्मक स्थितीत आहेत.

vivek

Recent Posts