महाराष्ट्र
Trending

Maharashtra News : शेतकऱ्यांकरिता खुशखबर! राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांच्या खरीप हंगामासाठी अनुदानाचे ई-शुभारंभ

CM And DCM Maharashtra : मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन यांची अनुदान वितरणाकरिता ई-शुभारंभ, राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाची अनुदान

मुंबई :- राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2023 च्या खरीप हंगामासाठीचे अनुदान वितरणाचा ई – शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत Maharashtra Cabinet Meeting करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर असे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येकी 5 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे.

पहिल्या टप्प्यात 49 लाख 50 हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये 2398 कोटी 93 लाख रुपये जमा करण्यात येत आहेत. राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे 96 लाख 787 इतकी आहे.

त्यापैकी 68 लाख 6 हजार 923 खात्यांची माहिती पोर्टलवर भरली गेली आहे. यात ‘नमो शेतकरी महासन्मान’च्या माहितीसोबत आधार जुळणी व 70 टक्केपर्यंत नावाची पडताळणी झालेली संख्या 41 लाख 50 हजार 696 इतकी आहे. तर आधार जुळणी व 69 टक्क्यांहून माहितीची पडताळणी झालेल्यांची संख्या 4 लाख 60 हजार 730 इतकी आहे. याव्यतिरिक्त आधारसंमतीपत्रानुसार माहिती भरलेल्या खात्यांची संख्या 17 लाख 53 हजार 130 इतकी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0