Maharashtra Breaking News : हिवाळी अधिवेशन संपताच हालचालींना वेग; ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर पत्रकार परिषद; राज्यात आजपासून आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता
मुंबई :- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात आज (15 डिसेंबर) मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission Maharashtra) आज दुपारी 4 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे तातडीची पत्रकार परिषद (Press Conference) बोलावली आहे. कालच राज्याचे हिवाळी अधिवेशन संपले असल्याने, आज होऊ घातलेल्या या पत्रकार परिषदेत 29 महानगरपालिका निवडणुकांची (Municipal Corporation Election 2025) घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. Maharashtra Breaking News
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली होती. आज पत्रकार परिषदेत ही घोषणा झाल्यास, आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांच्या हालचालींना वेग येईल.
निवडणूक प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या संस्था
एकूण 29 महानगरपालिका
बृहन्मुंबई (BMC), पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, सोलापूर, जळगाव, पनवेल, वसई विरार, मालेगाव, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, अकोला, अमरावती, नांदेड वाघाळा, परभणी, अहिल्यानगर, धुळे, जालना, सांगली मिरज कुपवाड, इचलकरंजी आणि मीरा भाईंदर महानगरपालिका.
एकूण 34 जिल्हा परिषद
धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, छ. संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…