Maharashtra News : बार्टी,सारथी आणि महाज्योती या महामंडळाच्या पीएचडी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपच्या मागणीसाठी लॉंग मार्च…
Maharashtra News : इंडियन सोशल मुव्हमेंट संघटनेचा, मोर्चाला पाठिंबा, स्कॉलरशिपच्या मागणीसाठी पीएचडीचे विद्यार्थी रस्त्यावर
पनवेल (जितीन शेट्टी) :- बार्टी, सारथी आणि महाज्योती या महामंडळाच्या माध्यमातून शासनाने Maharashtra Shahsan गेल्या अनेक वर्ष गोरगरीब विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी विविध पद्धतीने स्कॉलरशिप Maharashtra Scholarship आणि फेलोशिप दिली जाते. परंतु गेल्या तीन वर्षांपासून या महामंडळाकडून तसेच शासनाकडून कोणत्याही प्रकारची फेलोशिप या स्कॉलरशिप पूर्णतः बंद झाल्याने आज (17 जुलै), विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च काढण्यात आला यामध्ये असंख्य पीएचडी विद्यार्थ्यांचा सहभाग होता. फुलेवाडा ते विधान भवन असा हा लॉंग मार्च असून त्याला इंडियन्स सोशल मूव्हमेंट या संघटनेने पाठिंबा देऊन संपूर्ण मोर्चा त्यांच्यासोबत सहभागी झाले. या मोर्चाला सविता सोनवणे अध्यक्ष, प्रकाश कदम, तसेच अतुल बेळीकर , नरेंद्र परदेशी,कृष्णा वाघमारे यांचा सहभाग होता. Maharashtra Latest News
पीएचडी विद्यार्थ्यांच्या कोणत्या प्रमुख मागण्या आहे?
•बार्टी, सारथी व महाज्योती या संस्थेच्या phd धारक विद्यार्थ्यांवर फक्त 200 विद्यार्थांना Fellowship देणार असा अन्याय करणारा शासन निर्णय रद्द करण्यात यावा.
•2021 पासून नोंदणी केलेल्या सर्व phd धारक विद्यार्थांना सरसकट Fellowship देण्यात यावी.
मागील दोन वर्षांपासून अनेक राज्यातील प्रमुख संघटना संस्था प्राध्यापके विविध मंडळे यांनी शासनाला फेलोशिप, स्कॉलरशिप संदर्भात वेळोवेळी विविध प्रस्ताव टाकण्यात आले होते. परंतु शासनाकडून कोणत्याही प्रकारचे सकारात्मक तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय झाल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. Maharashtra Latest News