पुणे

Maharashtra NCP News : महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची नांदी! जुन्नरमध्ये ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’ एकत्र; सुनेत्रा पवारांचाही सकारात्मक प्रतिसाद

Maharashtra Political Latest News : “गद्दारांपेक्षा आमचा निष्ठावान मुसलमान श्रेष्ठ!”; राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर ‘दाढी’वरून वार; भाजपच्या ‘त्या’ 12 मुस्लिम नगरसेवकांचा काढला पाढा!

पुणे | अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यावे, अशी इच्छा अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली होती. ही इच्छा प्रत्यक्षात उतरवण्याचे काम जुन्नर तालुक्याने करून दाखवले आहे. माजी आमदार अतुल बेनके आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या पुढाकाराने जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येत ‘विभाजन’ टाळले आहे. या ऐतिहासिक निर्णयावर आता सुनेत्रा पवार यांनीही ‘मोहर’ उमटवली आहे.

जुन्नर पॅटर्न: मतांच्या विभाजनाला पूर्णविराम

अतुल बेनके यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “अजित दादा आणि अमोल कोल्हे यांच्या सहमतीने आम्ही जुन्नरमध्ये एकत्रित निवडणूक लढवली. आम्हाला मतांची विभागणी नको होती, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. राज्यात विलीनीकरण होईल की नाही हे माहीत नाही, पण जुन्नरने एकत्र वाटचाल करण्याचा निर्धार केला आहे.” विशेष म्हणजे, या निवडणुकीत दोन्ही गटांनी ‘घड्याळ’ या चिन्हाखाली एकत्र येत आपली ताकद दाखवून दिली आहे.

सुनेत्रा पवारांमध्ये दिसली ‘जिजामातां’ची चुणूक

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विजयी उमेदवारांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत जुन्नरमधील ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’ या दोन्ही पक्षांचे तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. अतुल बेनके यांनी सुनेत्रा वहिनींकडे जुन्नरमधील एकत्रीकरणाची भूमिका मांडली, ज्यावर त्यांनी “चांगली गोष्ट आहे,” असे म्हणत सकारात्मक प्रतिसाद दिला. “आम्हाला सुनेत्रा वहिनींमध्ये जिजामातांसारखी चुणूक दिसतेय आणि दादांचे प्रतिबिंब त्यांच्यात बघून आम्ही पुढे जात आहोत,” अशा भावना बेनके यांनी व्यक्त केल्या.

दादांचा वारसा आणि जुन्नरला पाठबळ

अजित पवार जसे जुन्नर तालुक्याला नेहमीच ताकद द्यायचे, तसेच पाठबळ सुनेत्रा पवार इथून पुढे देतील, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. “दादा नाहीत मग पुढे काय?” या प्रश्नाचे उत्तर सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांना मिळाले आहे. जुन्नरमधील या यशस्वी प्रयोगामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा ‘एक’ होणार का? याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago