Maharashtra municipal Election : महापालिका व नगरपालिकांना प्रभाग रचनेसाठी नगरविकास विभागाचा आदेश,मुंबईत 227 सदस्य कायम, इतर शहरांत बहु-सदस्यीय प्रभाग रचना निश्चित
मुंबई | राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. Maharashtra municipal Election सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नगरविकास विभागाने मोठा पाऊल उचलत सर्व 29 महानगरपालिका व 257 नगरपालिकांना तातडीने प्रभाग रचनेसंदर्भातील प्रस्ताव तयार करून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई महानगरपालिकेसाठी सदस्यसंख्या 227 वर स्थिर ठेवण्यात आली असून, एकसदस्यीय प्रभाग रचना कायम राहणार आहे. याआधी ठाकरे सरकारने ही संख्या 236 वर नेली होती, मात्र शिंदे सरकारने 8 सप्टेंबर 2022च्या निर्णयानुसार पूर्वस्थिती बहाल केली आहे. इतर महानगरपालिकांमध्ये मुख्यतः चार सदस्यीय प्रभाग रचना असून, विशेष परिस्थितीत तीन किंवा पाच सदस्यही शक्य आहेत. नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभागांची रचना ठरवण्यात आली आहे.
निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकते, असे संकेत असून, आगामी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना गती मिळण्याची चिन्हे आहेत.
महापालिकांची प्रभागसंख्या
मुंबई : 227
ठाणे : 131
नवी मुंबई : 111
पुणे : 162
नागपूर : 151
पिंपरी-चिंचवड : 128
कल्याण-डोंबिवली : 122
पनवेल : 78
छत्रपती संभाजीनगर : 115
कोल्हापूर : 81
वसई- विरार : 115
मीरा-भाईंदर : 95
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…