मुंबई

Maharashtra Monsoon Session : विधिमंडळात विरोधकांच्या गदारोळ, माजी उपराष्ट्रपती जनतेपेक्षा मोठे का? विरोधी पक्षाने उपस्थित केला प्रश्न

Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाच्या अधिवेशनात चांगलाच गदारोळ, विरोधकांकडून अधिवेशन कामकाज कालावधी वाढवण्यासाठी केली जाते मागणी

मुंबई :- विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस आहे. Maharashtra Monsoon Session कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्याविरुद्ध घोषणाबाजी दिली आहे. परंतु विधिमंडळाचे कामकाज चालू झाल्यावरही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज माजी उपराष्ट्रपती दोन्ही सभागृहातील सदस्याला संबोधित करणार आहे. मात्र यावरून सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली असून यावेळी सत्ताधाऱ्यांनी उत्तर देताना विरोधक संतापले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना Nana Patole यांनी उपराष्ट्रपती फार मोठे आहेत का? त्यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असे विधान केले यावरून सभागृहात चांगलाच गोंधळ झाला होता.

अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. कारण पावसाळी अधिवेशनाचा हा अंतिम आठवडा सोमवारी मुंबईतील पावसामुळे दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आले होते. तर बुधवारी सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावली. याला विरोधकांनी दांडी मारल्याने सभागृहात सत्ताधारी आक्रमक झाले होते त्यामुळे बुधवारी दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आले. याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाचा वाढवण्याची मागणी केली आहे. Maharashtra Monsoon Session Latest Update

वडेट्टीवार आक्रमक झाले. “सभागृहात कामकाज कसे असावे याचा आम्हालाही अनुभव आहे. काल सत्ताधाऱ्यांनी सभागृह बंद पाडले. हे देखील इतिहासात प्रथमच झाले. एका प्रस्तावावर चर्चा करायला अडीच तास लागले. सत्ताधारी आणि विरोधकांचे सहा प्रस्ताव असल्याने यावर मिळून वीस तास चर्चा झाली पाहिजे. उद्याही मतदान आहे, त्यामुळे कामकाज किती होईल माहित नाही. म्हणून अधिवेशनाचा एक दिवस वाढवावा” अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव म्हणाले, उपराष्ट्रपती यांचे संबोधन हे विधानसभेच्या सभागृहात होणार आहे. हे कधीच घडले नव्हते. हे संबोधन सेंट्रल हॉलमध्ये होणे अपेक्षित आहे. यावरून अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, उद्या मतदान असल्याने सेंट्रल हॉल निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्यात आला आहे. Maharashtra Monsoon Session Latest Update

यानंतर अध्यक्षांनी मात्र वाद मिटवला. दुपारी 5 वाजता उपराष्ट्रपतींचे संबोधन होणार आहे. त्यानंतर 6:30 वाजता पुन्हा कामकाज सुरू केले जाईल असे म्हणत त्यांनी वडेट्टीवारांना तुमचा प्रस्ताव होई पर्यंत कामकाज सुरू राहील असे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0