Maharashtra Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी ही विरोधकांचे सरकारच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन, सरकारविरुद्ध घोषणाबाजी
Maharashtra Monsoon Session Update: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन, सरकारविरुद्ध घोषणाबाजी भ्रष्टाचाराचा केला आरोप
मुंबई :- राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Monsoon Session)आज दहावा दिवस होता. अधिवेशनापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi ) नेत्यांनी निदर्शने केली आहेत. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भ्रष्टाचारी झाले चौकीदार असा महायुतीचा कारभार असे म्हणत महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सतेज पाटील, अजय चौधरी असे अनेक महाविकास आघाडीचे नेते आमदार उपस्थित होते.
महायुती सरकारची ऑफर पक्षप्रवेश करा, क्लीन चिट मिळवा, शूर आम्ही मिंधे, दादा आणि भाजपचे सरदार चिरडून गरिबांना होऊ पसार मदतीला आमच्या ‘मींध्यांचे सरकार’, सर्वसामान्यांच्या जीवाला नाही मोल, श्रीमंतांचा पैशांच्या जीवावर सुरू खेळ, भाजपाची वॉशिंग मशीन, आधी आरोप मग क्लीन चीट, भ्रष्टाचारी झाले चौकीदार, असा महायुतीचा कारभार अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत राज्यातील भ्रष्टाचाराविरोधात मजाविकास आघाडीने महायुती सरकारला घेरल.