Pune Bribe News : लाचखोर उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणीच्या घरी 51 लाखांची रोकड जप्त; वरिष्ठ निरीक्षकावरही टांगती तलवार

Pune Latest Bribe News : 3कोटींची लाच मागितली; पुणे एसीबीकडून 46.50 लाख स्वीकारताना अटक, चौकशीत मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता
पुणे :- पुण्यातील एका अत्यंत धक्कादायक लाचखोरी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. रविवारी 46 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी (मूळ रा. कर्जुले हरियाळ, जि. अहमदनगर) यांच्या भोसरी येथील घरी एसीबीच्या पथकाने झडती घेतली असता, 51 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. Pune Latest Crime News
एका दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी आरोपी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांनी तक्रारदाराकडे चक्क दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरले होते, आणि यातील पहिला हप्ता म्हणून 46 लाख 50 हजार रुपये स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ अटक केली.
चौकशीत मोठे गौप्यस्फोट
सोमवारी प्रमोद चिंतामणीच्या भोसरीमधील घराची झडती घेण्यात आली. या झडती दरम्यान 51 लाखांची रोकड एसीबीच्या पथकाला मिळाली. रोकडसह दागिन्यांचे आणि मालमत्तेची कागदपत्रे देखील एसीबीने जप्त केली आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चौकशीदरम्यान प्रमोद चिंतामणी यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, दोन कोटींपैकी एक कोटी रुपये हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात येणार होते.
या गौप्यस्फोटामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेचे संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची देखील चौकशी होण्याची शक्यता असून, एसीबी या प्रकरणाची सर्व दृष्टीकोणातून कसून चौकशी करणार आहे.



