मुंबई

Maharashtra Mahanagarpalika Election : महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकीचे ‘बिगुल’ वाजले! – 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला होणार निकालांचा ‘महा-स्फोट’

•उमेदवारी अर्ज भरण्यास 23 डिसेंबरपासून सुरुवात; राजकीय पक्षांच्या मागणीनुसार नामांकन प्रक्रिया ‘ऑफलाईन’; 3 कोटी 48 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

मुंबई :- महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा अखेर निश्चित झाल्या असून, राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकीचा सविस्तर आणि अंतिम कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान घेतले जाईल आणि अवघ्या 24 तासांत म्हणजेच 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.

निवडणुकीची धामधूम

या निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 23 डिसेंबर पासून सुरू होणार असून, 30 डिसेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज सादर करता येतील. अर्जाची छाननी 31 डिसेंबरला होईल, तर उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत 2 जानेवारी 2026 असेल. त्यानंतर 3 जानेवारी 2026 रोजी निवडणूक चिन्ह वाटप होऊन अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.या निवडणुकीत राज्यातील एकूण ३ कोटी 48 लाख मतदार आपले राजकीय भवितव्य ठरवणार आहेत. संपूर्ण राज्यात 29 हजार 147 मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) द्वारे मतदान केले जाईल. एकट्या मुंबई महापालिकेसाठी 10 हजार 111 मतदान केंद्रे असतील.

नामांकन आणि नियमावली

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार, नामनिर्देशन पत्रे (Nominations) भरण्याची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहे.तसेच, राखीव जागेवर लढणाऱ्या उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. उमेदवारांना जात प्रमाणपत्रासह वैधता प्रमाणपत्राची सत्यप्रत किंवा अन्य पुरावा सादर करावा लागेल. प्रमाणपत्र सादर करण्यास विलंब झाल्यास, सहा महिन्यांच्या आत ते देण्याचे हमीपत्र द्यावे लागेल. अन्यथा, संबंधित उमेदवाराची निवड रद्द होईल, असा स्पष्ट इशारा दिनेश वाघमारे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0