Ujjwal Nikam Road Show : महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्वल निकम यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा रोड शो
Ujjwal Nikam Road Show : पोलीस उप आयुक्त समाधान पवार यांनी उज्वल निकम आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या रोड शोच्या प्रचारामुळे वाहतूक व्यवस्था मध्ये बदल
मुंबई :- देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) देखील मुंबईत रोड शो करणार आहेत. महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्यासाठी योगी आदित्यनाथ यांचा मुंबईमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला आहे. उज्वल निकम यांच्या प्रचारार्थ कुर्ला येथे 18 मे रोजी होणार रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर उत्तर भारतीय मतांसाठी योगी आदित्यनाथ देखील आता मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. या रोड शो मी पोलीस उप आयुक्त समाधान पवार यांनी वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केला आहे. Ujjwal Nikam Road Show Updates
कशाप्रकारे वाहतूक व्यवस्था असणार आहे
प्रवेशबंदी करण्यात आलेले मार्ग व पर्यायी मार्ग
प्रवेशबंदी मार्ग :- हलाव पूलमार्गे न्यु मिल रोडवरून कुर्ला रेल्वे स्टेशनकडे जाणान्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- न्यु मिल रोडवरील श्रीकृष्ण चौक येथून उजवे वळण घेवून सिताराम भैरू मार्गे सुर्वे जंक्शन येथून त्यांच्या इच्छित स्थळी जातील.
प्रवेशबंदी मार्ग: लाल बहादुर शास्त्री मार्गावरील बेलग्रामी जंक्शन येथून बेलग्रामी मार्गावरून कुर्ला रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांकरिता प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- बेलग्रामी जंक्शन येथून यु-टर्न घेवून सुर्वे जंक्शन पुढे कुर्ला डेपो येथून त्यांच्या इच्छित स्थळी जातील