Maharashtra Lok Sabha Live Updates : महाराष्ट्रातील लोकसभेच्या 13 जागांवर 11 वाजेपर्यंत किती मतदान? उद्धव-राज ठाकरेंनी मतदान केलं
Maharashtra Lok Sabha Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 13 जागांसाठी मतदान होत आहे. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 13 जागांवर मतदान होणार आहे.
मुंबई :- शिवसेनेतील अंतर्गत फुटीनंतरची लोकसभा निवडणूक पहिली निवडणूक आहे. त्यामुळे ठाकरेंसोबतच बंडखोरी करणारे एकनाथ शिंदेंचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशातच ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) वांद्रे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड (Ujjwal Nikam Vs Varsha Gaikwad) आणि महायुतीकडून उज्वल निकम निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उद्धव ठाकरेंच्या मतदानानंतर ठाकरेंनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या पंजाला मतदान केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. Maharashtra Lok Sabha Latest Update 2024
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या शीवतीर्थवरुन मतदानकेंद्रापर्यंत चालत जाऊन मतदान केलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, कन्या उर्वशी ठाकरे, पुत्र अमित ठाकरे आणि सुष्ना मिताली ठाकरे उपस्थित होत्या. दरम्यान, राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे राहत असलेल्या मतदारसंघात ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी शिवसेनेला मतदान केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. Maharashtra Lok Sabha Latest Update 2024
सर्व मतदारसंघातील सकाळी 11 पर्यंतची टक्केवारी आतापर्यंत दिंडोरीमध्ये सर्वाधिक मतदान झाले. (Maharashtra Lok Sabha Voting Percentage Upto The 11 AM)
- भिवंडी- 14.792%
- धुळे – 17.383%
- दिंडोरी – 19.504%
- कल्याण – 11.465%
- उत्तर मुंबई – 14.716%
- उत्तर मध्य मुंबई – 15.737%
- उत्तर पूर्व मुंबई – 17.018%
- उत्तर पश्चिम मुंबई – 17.539%
- दक्षिण मुंबई – 12.7510%
- दक्षिण मध्य मुंबई – 16.6911%
- नाशिक- 16.3012%
- पालघर 18.6013%
- ठाणे – 14.86%