Maharashtra Lok Sabha Phase 4 Live : राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 30.85 टक्के मतदान, या दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे
Maharashtra Lok Sabha Phase 4 Live News : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज 13 मे रोजी मतदान होत आहे. एकूण 11 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान होत आहे.
नाशिक :- राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 30.85 टक्के मतदान झाले आहे. राज्यातील लोकसभेच्या 11 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान होत आहे.(Maharashtra Lok Sabha Phase 4 Voting) या सर्व जागांसह आतापर्यंत 30.85 टक्के मतदान झाले आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी बीड येथील मतदान केंद्रावर मतदान केले. राज्यातील लोकसभेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात अनेक दिग्गज नेते रिंगणात आहेत. Maharashtra Lok Sabha Live Updates
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, दुपारी 1 वाजेपर्यंत सर्वाधिक 51.87% मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले. याशिवाय मध्य प्रदेशात 48.52%, झारखंडमध्ये 43.80%, यूपीमध्ये 39.68%, तेलंगणात 40.38%, ओडिशामध्ये 39.30%, आंध्रमध्ये 40.26%, बिहारमध्ये 34.44%, महाराष्ट्रात 30.57% मतदान झाले आहे. जम्मू आणि काश्मीर मध्ये. Maharashtra Lok Sabha Live Updates