महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 Date : लोकसभेच्या निवडणुका जाहीर, महाराष्ट्रात पाच टप्पा होणार निवडणुका

Maharashtra Lok Sabha Election 2024 Date Declared : महाराष्ट्रात 48 जागा करिता पाच टप्प्यात मतदान होणार आहे.

मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 543 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत चालेल. 4 जूनला निकाल लागणार आहे.महाराष्ट्रात पाच टप्प्यांत होणार मतदान
महाराष्ट्रात 48 जागांसाठी पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान 5 जागांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला होणार असून यावेळी 8 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेत 11 जागांसाठी मतदान होणार आहे. तर, 13 मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील प्रक्रियेतही 11 जागांसाठी मतदान होईल. 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार असून 13 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल.

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?️ (Maharashtra Lok Sabha Election 2024 Date And Place ? )

  • पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
  • दुसरा टप्पा – 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
  • तिसरा टप्पा – 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
  • ️चौथा टप्पा – 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
  • पाचवा टप्पा – 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
  • मतमोजणी – 4 जून
vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago