मुंबई

Mira Bhayandar News : मीरा-भाईंदरमध्ये पूरसदृश परिस्थिती; माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांचा अंत्यविधी पुढे ढकलला

Mira Bhayandar Latest News : ज्येष्ठ नेते मेंडोन्सा यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी निवासस्थानी; 25 ऑगस्ट रोजी शोकसभा

मीरा रोड :- मीरा-भाईंदरमध्ये मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, वाहतूक विस्कळीत झाली आहे. या गंभीर परिस्थितीमुळेच, नुकतेच निधन झालेले मीरा-भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा Gilbert John Mendonca, passed away  यांच्या अंत्यविधीची प्रक्रिया एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.

यूरीन इन्फेक्शनमुळे निधन

माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांचे सोमवारी मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात यूरीन इन्फेक्शनच्या आजाराशी झुंज देताना निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे पार्थिव सध्या भाईंदर (पश्चिम) येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

शहरातील परिस्थितीमुळे निर्णय

मेंडोन्सा यांचा अंत्यविधी मंगळवारी सायंकाळी चार वाजता भाईंदर येथील ‘अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च’मध्ये होणार होता. मात्र, जोरदार पाऊस आणि रस्त्यांवर साचलेले पाणी यामुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या निकटवर्तीयांनी समाजमाध्यमांवर ही माहिती प्रसिद्ध केली आहे. आता त्यांचा अंत्यविधी बुधवारी (20 ऑगस्ट) सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे. तसेच, त्यांच्यासाठी 25 ऑगस्ट रोजी शोकसभा आयोजित केली जाणार आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

19 hours ago