मुंबई

Maharashtra Kirti Awards 2025 : आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र कीर्ती पुरस्कार सोहळा २०२५

महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यासाठी आयोजित “महाराष्ट्र कीर्ती पुरस्कार सोहळा २०२५” हा कार्यक्रम उत्साहात व भव्यदिव्य पद्धतीने पार पडला.

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मा. मनीषा जाधव मॅडम (पोलीस उपनिरीक्षक) उपस्थित होत्या. तसेच, चित्रपट नाट्य संस्थेचे अध्यक्ष शुभम शशिकांत मोरे, आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे अध्यक्ष व आयोजक गणेश विटकर, आणि बालगंधर्व कलाकार टॅलेंट कट्टा चे अध्यक्ष निलेंद्र यादव, अभिनेत्री स्नेहा भालेराव , अभिनेत्री हर्षिता ठाकूर व इतर मान्यवर विशेष उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजात नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींना “महाराष्ट्र कीर्ती पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला. यामध्ये अभिनेत्री रोहिनी केंद्रे, रांगोळी कलाकार मोनिका टेंबरे, फॅशन डिझायनर ललिता रांका, नृत्य दिग्दर्शक महेश भांबिड, निर्माते अरुण गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.

याचसोबत, या सोहळ्यात “बालगंधर्व कलाकार टॅलेंट कट्टा” या नवीन संस्थेच्या लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या विशेष क्षणाने सोहळ्याला एक वेगळीच ऊर्जाशक्ती आणि प्रेरणादायी दिशा लाभली.

एकूणच, महाराष्ट्र कीर्ती पुरस्कार सोहळा २०२५ हा समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांना सन्मानित करणारा व नवी प्रेरणा देणारा सोहळा ठरला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0