महाराष्ट्रठाणेमुंबई
Trending

Maharashtra IPS Transfer : राज्यात पोलीस बदल्यांचा धडाका! आणखी 21 वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदल्या

Maharashtra IPS Transfer Latest News : 13 आणि 17 मेनंतर आता 22 मे रोजी नवे आदेश; अनेक जिल्ह्यांना मिळाले नवे पोलीस अधीक्षक, उपायुक्त आणि समादेशक पदांवरही बदल

मुंबई :- राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल सुरूच असून, गृह विभागाने गुरुवारी (22 मे) आणखी 21 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. Maharashtra IPS Officer Transfer याआधी 13 मे रोजी 8 आणि 17 मे रोजी 27 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या ताज्या बदल्यांमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवे पोलीस अधीक्षक लाभले असून, उपायुक्त आणि समादेशक पदांवरही नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

प्रमुख बदल्यांमध्ये राकेश ओला यांची बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्तपदी, तर सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. आंचल दलाल यांना रायगडचा पोलीस अधीक्षक पदभार देण्यात आला आहे. महेंद्र पंडित यांची बदली ठाणे शहराच्या उपायुक्त पदावर झाली आहे.

प्रमुख बदल्या पुढीलप्रमाणे :

राकेश ओला – पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर ➝ पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई

सोमनाथ घार्गे – पोलीस अधीक्षक, रायगड ➝ पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर

आंचल दलाल – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे ➝ पोलीस अधीक्षक, रायगड

महेंद्र पंडित – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर ➝ पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर

योगेश गुप्ता – पोलीस अधीक्षक, नागरी सुरक्षा, नांदेड ➝ पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

बच्चन सिंग – पोलीस अधीक्षक, अकोला ➝ समादेशक, रा.रा. पो.बल, गट क्र. 4, नागपूर

अर्चित चांडक – पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर ➝ पोलीस अधीक्षक, अकोला

मंगेश शिंदे – आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई ➝ पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर

राजातिलक रोशन – सहायक पोलीस महासंचालक, मुंबई ➝ पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई

बाळासाहेब पाटील – पोलीस अधीक्षक, पालघर ➝ पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

यतिन देशमुख – अप्पर पोलीस अधीक्षक, गडचिरोली ➝ पोलीस अधीक्षक, पालघर

सौरभ अग्रवाल – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग ➝ गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

मोहन दहिकर – पोलीस उप आयुक्त, ठाणे ➝ पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग

विश्व पानसरे – पोलीस अधीक्षक, बुलढाणा ➝ समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र. 9, अमरावती

निलेश तांबे – गुन्हे अन्वेषण, नागपूर ➝ पोलीस अधीक्षक, बुलढाणा

समीर शेख – पोलीस अधीक्षक, सातारा ➝ पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई

तुषार दोषी – पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे ➝ पोलीस अधीक्षक, सातारा

सोमय मुंडे – पोलीस अधीक्षक, लातूर ➝ पोलीस उप आयुक्त, संभाजीनगर परिमंडळ 1

जयंत मीणा – पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, पुणे ➝ पोलीस अधीक्षक, लातूर

नितीन बगाटे – उप आयुक्त, संभाजीनगर ➝ पोलीस अधीक्षक, रत्नागिरी

रितू खोकर – अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली ➝ पोलीस अधीक्षक, धाराशिव

याशिवाय, संजय जाधव यांची बदलीही जाहीर करण्यात आली असून, त्यांच्या पदस्थापनेचा स्वतंत्र आदेश निघणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0