पुणे
Trending

महाराष्ट्र शोकाकुल: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

Ajit Pawar Latest News: बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात; विमानाचा स्फोट होऊन पाच जणांचा अंत

बारामती | महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar (वय 66) यांचे आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे येत असताना सकाळी 8.45 च्या सुमारास त्यांचे विमान लँडिंगच्या प्रयत्नात असताना शेतात कोसळले आणि क्षणात विमानाने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह विमानात असलेल्या सर्व पाच जणांचा मृत्यू झाला आहे. Ajit Pawar Latest News

नेमकी घटना कशी घडली?

अजित पवार हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला निघाले होते. त्यांनी सकाळी 8.10 वाजता खाजगी VSR कंपनीच्या ‘लिअरजेट 45’ (VT-SSK) विमानाने टेकऑफ केले. बारामती विमानतळावर उतरण्यापूर्वी काही मिनिटे आधी तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाने आणीबाणीच्या लँडिंगचा प्रयत्न केला, परंतु विमानाचा ताबा सुटला आणि ते धावपट्टीच्या जवळ असलेल्या एका शेतात कोसळले.

अपघातातील मृतांची नावे

डीजीसीए (DGCA) कडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

1.अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र)

2.विदीप जाधव (सुरक्षारक्षक – PSO)

3.पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट)

4.कॅप्टन सुमित कपूर (मुख्य वैमानिक)

5.कॅप्टन शांभवी पाठक (सह-वैमानिक)

राज्यावर शोककळा; दिग्गज नेत्यांकडून श्रद्धांजली

अपघाताची बातमी समजताच बारामतीसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचे कुटुंबीय दिल्लीहून तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहेत. रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून, “अजित दादा अमर रहे” च्या घोषणांनी परिसर सुन्न झाला आहे. मुख्यमंत्री आणि इतर राजकीय नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून, हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक “काळा दिवस” असल्याचे म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0